नपाच्या नवीन शॉपिंगचा लिलाव कोरोनामुळे झाला स्थगित

Monday, March 8, 2021

/ by Amalner Headlines
अमळनेर -
येथील नपाच्या शाळा क्र.५ मधील भुखंडावर नव्यानेच बांधण्यात आलेल्या कै.देवाजी बुधा महाजन व्यापारी संकुलाची आज दि. ८ मार्च रोजी होणारी लिलाव प्रक्रीया कोरोनामुळे स्थगित करण्यात आली आहे.
          या व्यापारी संकुलाच्या लिलावासाठी सुरक्षा अनामत रक्कम भरून काही इच्छुक उपस्थित होते. या लिलाव प्रक्रियेस परवानगी मिळावी अशी विनंती जिल्हाधिका-यांकडे नपाने कालच ई मेलद्वारे केली होती. पण कोरोना आजाराच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे या लिलाव प्रक्रियेस स्थगित करण्यात यावे असा आदेश जिल्हाधिकारी यांनी नपास दिला.त्यामुळे लिलाव स्थगित करण्यात आला आहे.

No comments

Don't Miss
© all rights reserved
Copyright © 2021 Amalner Headlines