"कोरोना" च्या पार्श्वभूमीवर हिंदु नववर्ष स्वागत शोभायात्रा स्थगित आपल्या घरीच उत्सव साजरा करा,नियमांचे पालन करण्याचे समितीचे आवाहन

Monday, March 23, 2020

/ by Amalner Headlines
---------------------------------------------------------------------------
           - * जाहीरात * -
------------------------------------------------------------------------------
अमळनेर -  दरवर्षी गुढीपाडव्यानिमित्त हिंदु नववर्ष स्वागतासाठी आयोजित करण्यात येत असलेली शोभायात्रा यावर्षी कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव असल्याने स्थगित करण्यातआली 
आहे. 
      दरवर्षी वर्षप्रतिपदेच्या निमित्ताने नववर्ष स्वागत शोभायात्रा काढण्यात येत असते.
यावर्षी दि.२५ मार्च रोजी स्वागत यात्रेचे नियोजन करण्यात आले होते. पण कोरोना व्हायरस या आजाराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे. हा आजार संसर्गजन्य आहे.त्यावर विविध उपाय योजना करण्यात येत आहेत. बाधित व्यक्तीशी कोणताही संपर्क येऊ नये हा महत्वाचा उपाय ठरणार आहे. नववर्ष स्वागत शोभायात्रेत हजारोंच्या संख्येने नागरिक सहभागी होत असतात.शासनानेही मोठ्या कार्यक्रमांचे आयोजन करू नये असे आवाहन केले आहे. त्यामुळे कोरोना व्हायरसचा प्रादुर्भावरोखण्यासाठी 
यावर्षी नववर्ष स्वागत शोभायात्रा न काढण्याचा निर्णय हिंदु नववर्ष स्वागत समितीने घेतलेला आहे. 
नागरिकांना आवाहन 
     आपल्या देशावर आलेल्या कोरोना व्हायरसच्या या संकटावर आपण सर्वांनी एकत्र येऊन मात करायची आहे.त्यासाठी शासकीय यंत्रणा,वैद्यकीय अधिकारी यांनी दिलेल्या सुचनांचे आपण पालन करावे. आपण सर्व दरवर्षी मोठ्या संख्येने उत्साहात नववर्ष स्वागत 
शोभायात्रेत सहभागी होत असतात.यावर्षी आपल्याला आपल्या घरी थांबूनच आपला उत्सव साजरा करायचा आहे.
शासनाने जारी केलेल्या सर्व नियमांचे पालन करून आपण आपल्या परिवाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन हिंदु नववर्ष स्वागत समितीच्या वतीने बजरंगलाल अग्रवाल यांनी केले आहे.
---------------------------------------------------------------------------------ओम टी पान मसाला च्या नविन दालन

No comments

Don't Miss
© all rights reserved
Copyright © 2021 Amalner Headlines