अमळनेर - राज्यात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासकीय व प्रशासकीय यंत्रणा जलद गतीने कामास लागली आहे. अमळनेर येथेही रूग्णांच्या सेवेसाठी आमदार अनिल पाटील यांच्या सहकार्याने शहरातील एम.डी. डॉक्टर्स यांनी गरजू रूग्णांसाठी सेवा समर्पित केली असून आज दि. २७ पासून सर्दी,ताप,खोकला या आजारांची तपासणी सेवा सुरू करण्यात आली असून शहरातील सर्व एम.डी. डॉक्टर्स व आय.एम. ए. संघटनेचे सदस्य प्रशासनाला मदत करत आहेत. त्यात सर्दी, ताप, खोकला, असणाऱ्या पेशंटची तपासणी करण्यात येणार असून औषधे लिहून देणार आहेत.
आमदार अनिल पाटील यांनी पंचायत समितीच्या सभागृहात घेतलेल्या बैठकीत यावर चर्चा करण्यात आली. याठिकाणी आमदार अनिल पाटील, प्रांताधिकारी सीमा अहिरे, तहसीलदार मिलिंद वाघ, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप वायाळ, पोलीस निरीक्षक अंबादास मोरे,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.गिरीश गोसावी, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश ताळे, नगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ.विलास महाजन यांच्यासह डॉ.अविनाश जोशी,डॉ.संदीप जोशी, डॉ.निखिल बहुगुणे,डॉ.किरण बडगुजर,डॉ. प्रशांत शिंदे, हे उपस्थित होते.शहरातील सर्व खाजगी डॉक्टर्सकडे येणाऱ्या सर्व रुग्णांना या ठिकाणी पाठवण्याची सूचना करण्यात येणार आहे. या ठिकाणी त्या सर्वांची नोंद घेतली जाणार आहे. त्यामुळे ज्यांना अशी लक्षणे आढळून येतील अशाच रुग्णांचा उपचार इंदिरा गांधी शाळेत सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत होणार आहे. याठिकाणी इतर तपासण्या होणार नाहीत त्यामुळे इतर रुग्णांनी येऊ नये.

येथे विनाकारण तपासणी करायला येणा-यांना प्रवेश दिला जाणार नाही. प्रांताधिकारी सीमा अहिरे या सर्व विखुरलेले पेन्शट एकत्र करून त्यांच्या तपासण्या करून घेणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आमदार अनिल पाटील यांनी या सर्व एमडी डॉक्टर्सशी चर्चा करून गुरुवारी प्रांताधिकारी व आरोग्य अधिकारी यांची बैठक घेतली व त्यातयेथील डॉक्टर्स शासनाला मदत म्हणून आमदार अनिल पाटील यांच्या आग्रहाने एक विनामूल्य सेवा करण्यासाठी तयार झाले आहेत. शहर व तालुक्यात शासकीय आरोग्य यंत्रणेकडून एव्हढे आव्हान स्वीकारले जाणार नाही म्हणून आमदार पाटील यांनी स्थानिक जनतेच्या सेवे करिता व कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव अधिक पसरू नये यासाठी ही उपाययोजना सुरू केली आहे.जनतेने या सेवेचा लाभ घेण्यासाठी साने गुरुजी विद्या मंदिर शाळेत सकाळी १० ते १ या वेळेत संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
No comments
Post a Comment