=======================================
-------------------------------------------------------------------------
सर्व विद्यार्थी, पालक बंधू भगिनी यांना विनम्र आवाहन करतो की, कोरोना (कोव्हिड 19,विषाणूंचा )प्रादुर्भाव टाळणे कामी आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय श्री नरेंद्रजी मोदी व महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे यांनी संपूर्ण देशाला , महाराष्ट्राला लॉक डाऊन केले असून २१ दिवस प्रत्येकाला घराबाहेर न पडण्याचे आदेश दिलेले आहेत.सदर आदेश हे केवळ आपल्या स्वतःचे , परिवाराचे आरोग्य सुरक्षित रहावे म्हणून दिलेले नाहीत तर संपूर्ण मानव जातीच्या हितासाठी दिलेले आहेत याचे भान राहू दया.आज घडीला आपल्या देशात कोरोना बाधितांची संख्या महाराष्ट्रातच जास्त आहे.विशेष करून पुणे , मुंबई येथे उच्च शिक्षणासाठी किंवा नोकरीच्या निमित्ताने आपल्या कुटुंबातील कुणीतरी त्या ठिकाणी असेल किंवा घरी परतला असेल तर खबरदारी म्हणून शासनाच्या ध्येय धोरणानुसार आपण त्यांची काळजी घेणे ,वैदयकीय तपासणी करून घेणे क्रमप्राप्त आहे. आपण सर्वांनी शासनाच्या वेळोवेळी दिलेल्या आदेशांचे पालन करणे,आपल्यासह आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घेणेबाबत दिलेल्या सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे . यासाठी सातत्याने आपणांस सरकारी यंत्रणा, पोलिस यंत्रणा,वैद्यकीय यंत्रणा ,नगरपालिका प्रशासन,सामाजिक संघटनांचे सहकार्य मिळत आहे . म्हणून मी साने गुरुजी नुतन माध्यमिक विदयालयाचा मुख्याध्यापक एस.डी. देशमुख आपणांस सर्वांना नम्र विनंती करतो की शासकीय आदेशांचे पालन करा,आपल्यासह कुटुंबाचे, मानवजातीचे आरोग्य जपू या व सर्वांना कोरोना या आजारापासून दूर ठेऊ या.
No comments
Post a Comment