अमळनेर मतदार संघात २४ कोटीच्या रस्त्याच्या कामांना मंजुरी

Monday, March 9, 2020

/ by Amalner Headlines
- * जाहीरात * -
--------------------------------------------------------------------------
अमळनेर -
विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पुरवणी मागण्यांवर चर्चा करतांना 
आमदार अनिल भाईदास पाटील यांनी केलेल्या मागणीनुसार अमळनेर विधानसभा मतदार संघात २४ कोटी रूपयांच्या रस्त्याच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. त्यात प्रमुख जिल्हा व राज्य या मार्गाच्या कामांना या अर्थसंकल्पात मंजूरी मिळाली आहे. त्यामुळे खराब रस्ते दर्जेदार होतील व रस्त्यां वरील वाहतूक सुरळीतपणे चालू होईल. खराब रस्त्यांमुळे नागरिकांना खूप मोठा त्रास सहन करावा लागतो. रस्ते खड्डेमय झाल्याने त्यामुळे खड्डे चुकवीत असतांना अपघात होतात. यामुळे वाहनचालकांना मोठा फटका बसतो.यासाठी या अर्थसंकल्पात तरतूद झाल्याने लवकर कामे सुरू होतील. 

     यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे आमदार अनिल भाईदास पाटील यांनी सतत पाठपुरावा केला त्याबद्दल त्यांचे आमदार अनिल पाटील यांनी आभार व्यक्त केले आहेत.
पुढील रस्त्याच्या कामांना मंजूरी
१) धरणगाव -राजवड- पारोळा रस्ता रामा क्र. ३९ - १ कोटी ५० लाख रुपये  
२) शहादा सांगवी हातेड अमळनेर पारोळा भडगाव रस्ता रामा क्र.०१ - २.५० कोटी रुपये 
३) पाळधी धरणगाव अमळनेर शिंदखेडा रस्ता राज्य महामार्ग क्रमांक ०६ ची सुधारणा करणे- १.५ कोटी रुपये 
४) जळोद - अमळनेर रस्ता राज्यमार्ग क्रमांक १ वर पुलाचे रुंदीकरण करणे-१.५ कोटी रुपये  
५) भोलाणे बहादरपुर भिलाली रत्नपिंप्री शेळावे रस्‍ता प्रजिमा क्र.४८ - बोरी नदीवर पुलाच्या ठिकाणी अर्ध बंधारा बांधणे-१.५ कोटी रुपये  

६) एरंडोल कल्याणी खुर्द मठगव्हान जळोद मांडळ रस्ता प्रजिमा क्र.५२ ची सुधारणा करणे- ३ कोटी ५० लाख 
७) वावडे जवखेडा जानवे कावपिंप्री पारोळा रस्ता प्रजिमा क्र.४६ ची सुधारणा करणे -२ कोटी 
८) जांभोरा ढेकू हेडावे अमळनेर ढेकू शिरसाळे तळवाडे मंडळ रस्ता प्रजिमा क्र.५१ मध्ये लहान पुलाचे बांधकाम करणे, वळण रस्त्यांची, सुधारणा करणे - ३ कोटी रुपये 
९) कलाली निंभोरा पिंगळवाडे प्रजिमा क्र.३ ची सुधारणा करणे व निंभोरा गावाजवळ संरक्षण भिंत उभी करणे ता अमळनेर रुपये १ कोटी रूपये 
१०) जांभोरा हेडावे अमळनेर ढेकू शिरसाळे तरवाडे मांडळ रस्ता प्रतिमा क्र.५१ ची सुधारणा करणे-  १  कोटी २५ लाख रुपये 
११) बोळे मोंढाळे बहादरपूर अमळनेर रस्ता प्रजिमा क्र.४४९ ची रुंदीकरणासह सुधारणा करणे - १  कोटी ५० लाख
१२)लासुर हिंगोणा मठगव्हाण पातोंडा दहिवद टाकरखेडा रस्ता प्रजिमा क्र ५  पुलाचे बांधकाम जोड रस्त्यासह करणे- १ कोटी रुपये २० लाख 
१३)भोलाणे बहादरपूर रत्नापिंप्री शेळावे रस्ता प्रजिमा क्र ४८ किमी ची सुधारणा करणे - २ लाख ५ ० हजार रुपये
--------------------------------------------------------------------------------
ओम टी पान मसाला च्या नविन दालन

No comments

Don't Miss
© all rights reserved
Copyright © 2021 Amalner Headlines