अमळनेर - विधानसभा मतदार संघातील अमळनेर व पारोळा तालुक्यात आज अखेर ६१० मि.मी.पेक्षा जास्त पाऊस झाला आहे. मागील दोन आठवड्यापासुन सततच्या पर्जन्यमानामुळे या खरीप हंगामातील उडीद,मुग आदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकरी हवालदिल झालेले आहेत.बाधित क्षेत्राचे तात्काळ पंचनामे करुन जिल्हाधिकारी कार्यालय,जळगांव व आयुक्त कार्यालय,नाशिक यांचे मार्फत प्रस्ताव शासनास सादर करावा. यासाठी जिल्हाधिकारी यांनी त्यांचे कार्यालयीन पत्र क्रमांक - जि अ कृ अ/ ने.आ./पंचनामा/३१४५ दिनांक २१ आॅगस्ट २०२० च्या धर्तीवर अमळनेर व पारोळा तालुक्याचे तहसिलदार यांना आदेश द्यावेत अशी मागणी
मा.आ.कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
No comments
Post a Comment