स्वच्छ सर्वेक्षण २०२० मध्ये अमळनेर चमकले महाराष्ट्रात १० वा तर पश्चिम झोन मध्ये १० वा क्रमांक

Friday, August 21, 2020

/ by Amalner Headlines
अमळनेर -
केंद्र शासनाच्या  स्वच्छ सर्वेक्षण २०२० चा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे.यात अमळनेर शहर राज्यात व देशाच्या पश्चिम झोनमध्ये चमकले आहे. 
        अमळनेर नगर परिषदेच्या उत्तम कामगिरीमुळे व प्रभावी अंमलबजावणीमुळे केंद्र शासनाने अमळनेर शहराला संपूर्ण भारताच्या पश्चिम झोनमध्ये १० वा क्रमांक व संपूर्ण भारत देशात १४२ व्या क्रमांकाचे उत्कृष्ट शहर घोषित केले असल्याने अमळनेरकरांची मान उंचावली आहे. ही बाब अमळनेरच्या सर्व नागरिकांसाठी अभिमानास्पद व भूषणावह आहे असे  नगरपरिषदेला प्रत्यक्षात कृतीतून मार्गदर्शन करणारे मा.आ. कृषिभूषण साहेबराव पाटील लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. पुष्पलता साहेबराव पाटील व मुख्याधिकारी डॉ. विद्या गायकवाड यांनी सांगितले.
           माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी गेल्या दोन दशकापासून विद्यमान आमदार असतांना व आता नगर परिषदेच्या माध्यमातून सर्वांना हेवा वाटावा असे अमळनेर शहर बनविण्याचा प्रयत्न केला आहे. वृक्ष लागवड,वृक्ष संवर्धनाबाबत जनजागृती व प्रचार करून नेहमीच यशस्वी प्रयत्न केला आहे. त्यासाठी सर्व नगरसेवक, नगरसेविका, मुख्याधिकारी, आरोग्य विभाग अधिकारी अन् कर्मचारी , नगरपरिषद प्रशासन आणि अमळनेरकर नागरिकांनी  देखील वेळोवेळी त्यांना साथ दिली आहे. स्वच्छ, सुंदर व हरित अमळनेर हे अनेक चांगल्या सोयी सुविधांमुळे अनेकांनी आपल्या पसंतीचे शहर म्हणून नेहमीच प्राधान्य दिले असल्याचे दिसून आले आहे.
             स्वच्छ सर्वेक्षण २०२० मध्ये ५० हजार ते १ लाखपेक्षा कमी लोकसंख्येच्या शहरांमध्ये अमळनेर शहराने संपूर्ण भारताच्या पश्चिम झोन मध्ये १०  वा, महाराष्ट्रात राज्यात १० वा क्रमांक तसेच संपूर्ण भारत देशात १४२ वे उत्कृष्ट शहर असे मानांकन प्राप्त केल्याने सर्वत्र आनंद व्यक्त करण्यात येत आहे.

No comments

Don't Miss
© all rights reserved
Copyright © 2021 Amalner Headlines