अमळनेर - येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानेलावलेल्या तपासात मोटरसायकलसह या प्रकरणातील एका संशयित आरोपीस अटक केली आहे.
अमळनेर पोलीस स्टेशनला दाखल गुन्हा रजि.नं.४१२/२०१९ भादंवि कलम ३७९ या गुन्ह्यातील संशयित आरोपी मिहीर नितीन पवार (वय १९) रा.शिंदखेडा,जि.धुळे यास अटक करण्यात आली असून त्याच्याकडून सुमारे ५०,००० रुपये किंमतीची २२० पल्सर ही मोटरसायकल ताब्यात घेण्यात आली आहे. पो.हे.कॉ. रविंद्र पाटील,कमलाकर बागुल,रामकृष्ण पाटील,मुरलीधर भारी यांनी ही कारवाई केली. संशयित आरोपीस अमळनेर पोलीस स्टेशनला हजर केले आहे.
No comments
Post a Comment