अमळनेर - विभागीय आयुक्तांनी राबविलेल्या उभारी योजनेंतर्गत तालुक्यातील कलाली येथील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबास १ लाख रूपयांची मदत घरपोच देण्यात आली
कलाली येथील निंबा मणीलाल पाटील या शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली होती. या प्रकरणी तहसिलदार मिलिंद वाघ यांनी आयुक्तांच्या उभारी योजनेंतर्गत सर्व कागदपत्रांची पडताळणी करून त्या शेतकऱ्याच्या वारसदार कुटुंबाला ३० हजार रुपये रोख व ७० हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात फिक्स डिपॉझिट म्हणून ठेवण्यासाठी धनादेश कलाली येथे जाऊन देण्यात आला. यावेळी तहसिलदार मिलिंद वाघ यांच्यासोबत तलाठी वाल्मिक पाटील,लिपिक संदीप पाटील हजर होते तसेच विभागीय आयुक्त गमे यांच्या सूचनेनुसार या कुटुंबाबतची माहिती घेऊन समाजसेवी संस्थांमार्फत कुटुंबाला काही सुविधा देण्याबाबत प्रयत्न सुरू असल्याचे तहसिलदार वाघ यांनी सांगितले.
No comments
Post a Comment