अमळनेर : तालुक्यातील खवशी येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या संचालिका कै.गं.भा.यमुनाबाई उत्तम सूर्यवंशी यांचे नुकतेच शनिवार दिनांक १८ जून रोजी निधन झाले. त्यांचे स्मृतीप्रित्यर्थ गुरुवार दिनांक ३० जून २०२२ रोजी त्यांचे तेराव्याचे दिवशी कुटुंबियांचे वतीने ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना डोलीचे लोकार्पण करण्यात आले. मुलगा संजय सूर्यवंशी यांनी डोलीची विधीवत पूजा केल्यावर अरुणबापू देशमुख यांचे शुभहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यांची होती उपस्थिती
याप्रसंगी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी अरुण बाबुराव देशमुख, गणेश कन्हैयालाल पाटील, भगवान गोसावी, गुलाब हेमकांत पाटील,अनिल शिरसाठ, ग्रामसेविका सौ.पवार मॅडम, खवशी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन श्यामकांत देशमुख व अन्य पदाधिकारी, शालेय व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, लोटन फकिरा पाटील, रोहिदास बंडू कापडे, हेमकांत पाटील, भूषण भाईदास पाटील, सुर्यकांत कापडे, सुर्यकांत पाटील, पांडूरंग पाटील, भालचंद्र पाटील, प्रकाश पाटील, देवराम मराठे, स्वप्निल सूर्यवंशी, कालिदास सूर्यवंशी व ग्रामस्थ उपस्थित होते.
No comments
Post a Comment